वडगाव रासाई येथे ऊस जळाल्याने नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वडगाव रासाई येथे ऊस जळाल्याने नुकसान
वडगाव रासाई येथे ऊस जळाल्याने नुकसान

वडगाव रासाई येथे ऊस जळाल्याने नुकसान

sakal_logo
By

मांडवगण फराटा, ता. ७ : वडगाव रासाई (ता. शिरूर) येथे वीज वाहक तारांमध्ये शॉर्टसर्किट होऊन तीन एकर ऊस जळून खाक झाला. पांडुरंग महादेव शेलार यांच्या शेतातून गेलेल्या एल. टी. लाईन वरील जंप फुटल्याने शॉर्टसर्किट झाल्याने ही घटना घडली. शेलार यांचे एक हेक्टर क्षेत्रामधील ठिबक सिंचन संचही जळून खाक झाला. उ‌साचे व ठिबक सिंचन संच मिळून सुमारे पावणे आठ लाख रुपयांचे शेलार यांचे नुकसान झाले. शेतकरी कमलेश नामदेव परभाणे यांचा अर्धा एकर ऊस रोहित्रामध्ये बिघाड झाल्याने ऑइल फेकल्याने जळून खाक झाला.परभाणे यांचे एक लाख तीस हजाराचे नुकसान झाले. तलाठी व महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. दरम्यान, जीर्ण व झोळ आलेल्या तारा पावसाळा चालू होण्याअगोदर बदलण्यात याव्यात, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीकडून करण्यात आली आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Mph22b00492 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top