भीमेत बुडीत बंधारा बांधण्याची मांडवगणला शेतकऱ्यांची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भीमेत बुडीत बंधारा बांधण्याची मांडवगणला शेतकऱ्यांची मागणी
भीमेत बुडीत बंधारा बांधण्याची मांडवगणला शेतकऱ्यांची मागणी

भीमेत बुडीत बंधारा बांधण्याची मांडवगणला शेतकऱ्यांची मागणी

sakal_logo
By

मांडवगण फराटा, ता. १५ : येथील (ता.शिरूर) मांडवगण-बाभूळसर शिवेवर भीमा नदी पात्रात पाकुळखडा येथे बुडीत बंधारा बांधावा, अशी मागणी माजी उपसरपंच संजय फराटे व या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा परिसर तसेच दौंड तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्र भीमेच्या पाण्यामुळे ओलिताखाली आले आहे. या भागात दर उन्हाळ्यात पाण्याची टंचाई निर्माण होते. या भागात बंधारा नसल्याने उन्हाळ्यात पाणी टिकत नाही. परिणामी अनेक शेतकऱ्यांची पिके उन्हाळ्यात पाण्याअभावी जळून जातात. तसेच भीषण पाणी टंचाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो.

याबाबत बोलताना माजी उपसरपंच संजय फराटे यांनी सांगितले की, पाकुळखडा परिसरात बुडीत बंधारा व्हावा ही अनेक वर्षांपासून आमची मागणी आहे. यासाठी सातत्याने शासन दरबारी मांडवगण फराटा, कानगाव ग्रामपंचायतीने पाठपुरावा केला आहे. माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांनी त्यांच्या कार्यकाळात या परिसरात पाठपुरावा करून सर्व्हे केला होता. मात्र त्यात यश आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेत शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार, दौंडचे आमदार राहुल कुल यांनी बुडीत बंधारा करणेसाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी संजय फराटे यांनी केली आहे.

यावेळी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य अशोक जगताप, सोसायटीचे संचालक सुनील फराटे, बिभीषण फराटे, सोमनाथ चोथे, बाळासाहेब वाबळे, उल्हास फराटे आदी उपस्थित होते.


00590

Web Title: Todays Latest District Marathi News Mph22b00496 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top