
मांडवगण फराटा येथे सेवानिवृत्त पोलिस पाटीलांचा सन्मान
मांडवगण फराटा, ता. २७ : ग्रामीण भागातील पोलिस पाटलांनी चांगले काम केले की, त्याचे फळ नक्की मिळते याचा प्रत्यय नुकताच मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे आला. मांडवगण फराटा येथील पोलिस पाटील गंगाधर भाऊसाहेब फराटे इनामदार हे आपल्या पोलिस पाटील पदाच्या २८ वर्षाच्या सेवेनंतर सेवा निवृत्त झाले. त्यानिमित्त मांडवगण फराटा ग्रामस्थांच्या वतीने त्यांची गावातून मिरवणूक काढून सत्कार केला. फराटे यांनी गावासाठी केलेल्या कामाची पावती म्हणून उतराई होत पाच तोळे वजनाची चेन व उभयतांना दोन अंगठ्या ग्रामस्थांच्या वतीने भेट दिल्या.
मांडवगण फराटा सारख्या सुमारे १७ हजार लोकसंख्येच्या गावात पोलिस पाटील पदावर काम करण्यास सुरवात केल्यानंतर गावातील होणारे छोटे-मोठे तंटे गावातच मिटवून त्यांनी आदर्श निर्माण केला होता. त्यांनी मोठ्या प्रमाणातील भांडण तंटे मिटवत असताना दोन पिढ्यांपासून सुरू असलेले वादही त्यांनी मिटवले. काम करताना त्यांनी वेळोवेळी सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम केले. आपल्या २८ वर्षाच्या प्रदीर्घ कारकिर्दीमध्ये साडेचार हजारांहून अधिक तंटे मिटविल्याचे पोलिस पाटील गंगाधर फराटे यांनी सांगितले.
या वेळी घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादा पाटील फराटे, संचालक बाबासाहेब फराटे, दत्तात्रेय फराटे, रामचंद्र नागवडे, संजय घाडगे, काकासाहेब खळदकर, सचिन शेलार, नामदेव घोरपडे, सरपंच शिवाजी कदम, डॉ. अखिलेश राजूरकर, शरद चकोर, शरद गायकवाड, सुभाष पाटील फराटे, बाळासाहेब चौधरी, बिभीषण फराटे, धनंजय फराटे, दीपक पाटील फराटे, संभाजी फराटे, अशोक जगताप, मनीषा सोनवणे, सीमा फराटे, लतिका जगताप, सुरेखा जगताप, प्रतिभा बोत्रे व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
Web Title: Todays Latest District Marathi News Mph22b00502 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..