तांदळीच्या सरपंचपदी मोनिका कळसकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तांदळीच्या सरपंचपदी मोनिका कळसकर
तांदळीच्या सरपंचपदी मोनिका कळसकर

तांदळीच्या सरपंचपदी मोनिका कळसकर

sakal_logo
By

मांडवगण फराटा, ता. ३ : तांदळी (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मोनिका कळसकर व उपसरपंचपदी सावता गदादे यांची बिनविरोध निवड झाली.
येथील ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत घोडगंगा कारखान्याचे संचालक सुभाष कळसकर व शिवसेना नेते मच्छिंद्र गदादे यांच्या नेतृत्वाखाली भैरवनाथ विकास पॅनेलला बहुमत मिळाले होते. सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी अनुक्रमे मोनिका कळसकर व सावता गदादे यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी संजीव साळवे व तलाठी दीपक मोरे यांनी जाहीर केले.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य मच्छिंद्र गदादे, गोरख गदादे, संजय कळसकर, दत्तात्रेय गदादे, पोपट गदादे, दिलीप कळसकर, लक्ष्मण कळसकर, गोरख खोरे, दत्तात्रेय खोरे, छगन खोरे, आश्रत गदादे, लक्ष्मण कांबळे, रेखा गदादे, रेखा कळसकर, सुनीता खोरे, राजश्री खोरे, चंद्रकला सोनवणे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest District Marathi News Mph22b00517 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..