मांडवगणमधील दुकाने फोडणारे केडगावात जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मांडवगणमधील दुकाने फोडणारे केडगावात जेरबंद
मांडवगणमधील दुकाने फोडणारे केडगावात जेरबंद

मांडवगणमधील दुकाने फोडणारे केडगावात जेरबंद

sakal_logo
By

मांडवगण फराटा, ता. ६ : मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे मध्यरात्री १३ दुकाने फोडणारे चोरटे दरोड्याच्या तयारीत असताना केडगाव-चौफुला (ता. दौंड) येथे रात्रग्रस्ती दरम्यान केडगाव पोलिसांच्या जाळ्यात अडकले.
केडगाव चौफुला येथे काही तरुण दरोड्याच्या तयारीत एकत्र जमलेले आहेत, अशी खात्रीशीर माहिती मंगळवारी (ता. ६) पहाटे तीनच्या सुमारास पोलिस नाईक सोनवणे व कापरे यांना गोपनीय बातमीदाराकडून मिळाली. त्यांनी ती माहिती पोलिस निरीक्षक नारायण पवार व पोलिस उपनिरीक्षक नागरगोजे यांना कळविली. केडगाव चौफुला येथे दरोडयाच्या तयारीत असताना पोलिसांनी जागेवर पकडण्याचा प्रयत्न करीत असताना त्यातील ७ पैकी १ जण पळून गेला, तर ६ जणांना जागेवरच पकडण्यात आले. त्यावेळी चोरट्यांकडील अॅक्टीव्हा मोटारसायकल (क्र. एमएच १४ जी.के. ११७८), एक स्प्लेंडर प्लस मोटरसायकल (क्र. एम.एच. ३८ ए.सी. ४६०३), एक कोयता, लोखंडी कटावणी, एक पक्कड, मिरची पावडरची पुड, एक बॅटरी, असे साहित्य मिळून आले. एक हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटारसायकल (क्र. एम.एच. ३८ ए.सी. ४६०३), तसेच चार मोबाईल, असा एकूण १लाख १५ हजार तीनशे दहा रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी केडगाव पोलिसांनी सुनील मारुती लोणी (वय २२), सौरभ दत्तात्रेय शिंदे (वय २४, दोघेही रा. चिंचवड बालाजीनगर), राहुल राधाकिसन आगम (वय २१, रा. दिघी- आळंदी), अभिषेक सुनील चौधरी (वय २२), राहुल रमेश चव्हाण (दोघेही रा. केडगाव), विकास नारायण सानप (वय १९, रा. फरंडेनगर-दिघी) या सहा जणांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे अधिक तपास केला असता त्यांनी मांडवगण फराटा येथे ३१ ऑगस्ट रोजी रात्री १३ दुकाने फोडल्याची कबुली दिली.

Web Title: Todays Latest District Marathi News Mph22b00522 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..