फराटे पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फराटे पाटील महाविद्यालयात 
राष्ट्रीय सेवा योजना दिवस
फराटे पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस

फराटे पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस

sakal_logo
By

मांडवगण फराटा, ता. २९ : येथील श्री वसंतराव फराटे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रवीण कुरुमकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. दिनेश पवार उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय सेवा योजना गीताने झाली.

प्राचार्य कुरुमकर म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांमध्ये श्रमसंस्कारांबरोबर मूल्य शिकवते. नम्रपणा, विनयशीलता, श्रमनिष्ठा या गुणांनी परिपूर्ण होऊनच राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक स्वयंपूर्ण होतो.

प्रा. दिनेश पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांना नवी वाट, नवी दिशा, नवीन शोध व क्षमतांचा शोध देणारे माध्यम आहे.

राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी जयराम पवार यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या गेल्या दहा वर्षांच्या कार्याचा आढावा घेतला.

या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजीव फराटे पाटील, सचिव मृणाल फराटे पाटील, प्रा. सोनाली म्हेत्रे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रमेश शितोळे यांनी केले, प्रा. सोनाली म्हेत्रे यांनी आभार मानले.
------------