जमीन वाटपाच्या वादातून चुलत्यावर तलवारीने वार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जमीन वाटपाच्या वादातून
चुलत्यावर तलवारीने वार
जमीन वाटपाच्या वादातून चुलत्यावर तलवारीने वार

जमीन वाटपाच्या वादातून चुलत्यावर तलवारीने वार

sakal_logo
By

मांडवगण फराटा, ता. १८ : वडगाव रासाई (ता. शिरूर) येथे जमीन वाटपाच्या वादातून पुतण्याने चुलत्यावर तलवारीने वार करीत प्राणघातक हल्ला केला आहे.
याप्रकरणी तात्यासाहेब निवृत्ती ढवळे (वय ६२) यांनी शिरूर पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी माहिती दिली की, फिर्यादी ढवळे व त्यांचे बंधू बबन निवृत्ती ढवळे यांच्यामध्ये जमिनीच्या वाटपपत्रावरून वाद सुरू आहेत. फिर्यादी हे मुलगा आशिष व पुतण्या सुजित यांच्या बरोबर सोमवारी (ता. १५)सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास गट नंबर ८९३ या आपल्या शेतात कामानिमित्त गेले होते. यावेळी त्यांच्या शेतात पुतण्या अमोल बबन ढवळे, भाऊ बबन निवृत्ती ढवळे व सोनबा धनाजी चांदगुडे (रा. सादलगाव) हे ट्रॅक्टरने काकरी मारीत होते. त्यामुळे तात्यासाहेब यांनी ट्रॅक्टर अडवत काकरी मारण्यास विरोध केला होता. यावेळी पुतण्या अमोल बबन ढवळे याने त्यांच्या डोक्यावर तलवारीने वार करत प्राणघातक हल्ला केला. तलवारीचा वार चुकवत असताना त्यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. यावेळी बबन निवृत्ती ढवळे व सोनबा धनाजी चांदगुडे यांनी हल्ला करण्यास चिथावणी दिली. पोलिसांनी आरोपींना अटक केली. याबाबतचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संदीप यादव हे करीत आहेत.