मांडवगणला रात्री आठपर्यंत मतदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मांडवगणला रात्री आठपर्यंत मतदान
मांडवगणला रात्री आठपर्यंत मतदान

मांडवगणला रात्री आठपर्यंत मतदान

sakal_logo
By

मांडवगण फराटा, ता. १८ : शिरूर तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या मांडवगण फराटा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चुरशीने मतदान झाले. रात्री ८ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरु होती. दोन ते सहा या वॉर्डातील मतदान प्रक्रिया सायंकाळी साडेपाचलाच संपली. मात्र, वॉर्ड क्रमांक एकमध्ये रात्री उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती.
मांडवगण फराटा येथे सकाळपासूनच मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. सहा वॉर्डातील १७ व थेट सरपंचपदासाठी मतदान झाले. ९ हजार ४३५ पैकी ७५५६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. येथे सकाळपासूनच मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. शिरूरचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, सहायक पोलिस निरीक्षक संदीप यादव, उपनिरीक्षक विक्रम जाधव, सहाय्यक उपनिरीक्षक राजेंद्र साबळे, प्रल्हाद जगताप, संपत खबाले, योगेश गुंड, राजाराम गायकवाड आदी कर्मचाऱ्यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. वॉर्ड क्रमांक ३मध्ये तांत्रिक कारणामुळे सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत ईव्हीएम मशिन बंद पडले होते. तब्बल पाऊण तासानंतर प्रशासन वोटिंग मशिन सुरू करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचले. दोन तासानंतर पुन्हा एकदा मतदान प्रक्रियेला सुरवात झाली. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना रांगेत उभे राहून मोठा मनस्ताप सहन करावा लागला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. एस. पावरा, सर्कल संजीव साळवे, तलाठी दीपक गांगुर्डे यांनी काम पाहिले.

ग्रामसेवकाची दांडी
मांडवगण फराटा येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक विशाल नाईकनवरे व तलाठी मांडवगण फराटा यांच्याकडे जबाबदारी दिली होती, परंतु ग्रामसेवक नाईकनवरे हे मतदान संपेपर्यंत दिवसभर मतदान केंद्रावर फिरकले नाहीत. त्यांनी तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचे चित्र पाहायला मिळाले.

कर्मचारी वडापाववर
मतदान केंद्रावर निवडणूक अधिकारी व पोलिस कर्मचारी यांना जेवणाची व्यवस्था करणे हे महसूल विभागाचे काम असते. परंतु, दिवसभर महसूल विभागाने कुठल्याच पद्धतीची जेवणाची व्यवस्था न केल्याने कर्मचाऱ्यांना वडापाव व चहावरच दिवस काढावा लागला. मतदान केंद्रावर असलेल्या कर्मचाऱ्यांकडून प्रशासनाच्या या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. महसूल विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे निवडणूक अधिकारी व पोलिस कर्मचारी दिसून आले.