
कृषी सेवा रत्न पुरस्काराने चासच्या फल्ले यांचा गौरव
महाळुंगे पडवळ, ता.११ : चास (ता.आंबेगाव) येथील सुपुत्र व राजगुरुनगर येथे कार्यरत असलेले कृषी पर्यवेक्षक संजय कोंडाजी फल्ले व पत्नी सुनीता फल्ले यांना महाराष्ट्र शासनाचा २०१७ चा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील ‘कृषी सेवा रत्न पुरस्कार’ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
नाशिक येथे झालेल्या कार्यक्रमास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (ऑनलाइन), उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दादासाहेब भुसे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, निखिल संजय फल्ले, प्रतिक्षा निखिल फल्ले, आशिष संजय फल्ले उपस्थित होते.
संजय फल्ले यांनी कृषी विस्तार, फलोत्पादन, मृदसंधारण, परीक्षेत्र विकास, फुलशेती आदी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली. लोकपंचायत सेवाभावी संस्थेमार्फत निराधार महिलांसाठी आधार केंद्र, आदिवासी नागरिकांना वन हक्क मिळवून देण्यात पुढाकार, आरोग्य विषयक प्रकल्प त्यांनी राबविले आहेत. पुणे जिल्हा परिषद सदस्या तुलसी भोर, शिरूर लोकसभा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन भोर यांनी त्यांचे अभिनंदन केले.
--------------------------------------------------------------------------------------------------------
00880
Web Title: Todays Latest District Marathi News Mpw22b00482 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..