
कळंब येथे वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार
महाळुंगे पडवळ, ता. ८ : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर कळंब (ता. आंबेगाव) येथे सोमवारी (ता. ६) रात्री ११ वाजता अज्ञात वाहनाने बिबट्याला धडक दिली. त्यात बिबट्याचा मृत्यू झाल्याने वन्यप्रेमींकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर कळंब ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात सहाणेमळया नजीक बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्याची माहिती शेतकरी ओम ऊर्फ बंटी भालेराव यांनी बिबट्या रेक्यू टीमचे सदस्य सुनील भालेराव यांना दिली. वनपाल नारायण आरुडे, कैलास दाभाडे, कोंडीभाऊ डोके व सुनील भालेराव यांनी घटनास्थळी भेट देऊन मृत बिबट्याला ताब्यात घेतले. यावेळी ग्रामस्थ अरुण नाना भालेराव, कैलास भालेराव, योगेश भालेराव यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.
मंगळवारी (ता. ७) सकाळी पेठ-अवसरी घाट येथे कळंबचे पशुवैद्यकीय अधिकारी डी. एम. म्हस्के यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस व सहाय्यक वनसंरक्षक संदेश पाटील यांच्या उपस्थितीत बिबट्याचे अग्नीदहन करण्यात आले. बिबट्या मादी जातीचा असून एक ते दीड वर्ष वयाचा होता.
Web Title: Todays Latest District Marathi News Mpw22b00511 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..