
आंबेगावातील पिकांमध्ये साचले पावसाचे पाणी
महाळुंगे पडवळ, ता. ११ : आंबेगाव तालुक्यातील कळंब, साकोरे, महाळुंगे पडवळ परिसरात शनिवारी (ता. ११) दुपारी मेघगर्जनेसह झालेल्या जोरदार मॉन्सून पूर्व पावसाने पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले.
सलग तीन दिवस पाऊस पडत आहे. दुपारी तीनच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. कळंब, लौकी, चांडोली बुद्रुक परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यानंतर पुन्हा ४ वाजता जोरदार पावसाने हजेरी लावली. साकोरे, महाळुंगे पडवळ, चास येथे मॉन्सून पूर्व पावसाने शेतात पाणी साचले असून पिके जलमय झाली आहेत. त्यामुळे शेतीची कामे ठप्प झाली आहेत. ज्वारी, मका काही प्रमाणात जमीनदोस्त झाले आहे.
गेल्या तीन दिवसांपासून पडत असलेला पाऊस ऊस पिकाला उपयुक्त असून बाजरी, मेथी, कोथिंबीर व अन्य तरकारी मालाला नुकसान करणारा ठरत आहे. पावसामुळे तोडणी, खुरपणी व अन्य मशागतीची कामे ठप्प झाली आहेत, असे शेतकरी श्रीकांत थोरात व बाळासाहेब चासकर यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest District Marathi News Mpw22b00516 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..