
चिकनचे दर घसरल्याने ग्राहकांची चंगळ
महाळुंगे पडवळ, ता. १६ : सध्या आषाढ महिना सुरू असून बॉयलर कोंबडीच्या लिफ्टिंग दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना १६० रुपये किलो दराने चिकन मिळत आहे. ऐन आषाढ महिन्यात ग्राहकांची चंगळ झाली आहे. आंबेगाव तालुक्यात दोन महिन्यापूर्वी बॉयलर कोंबडीचा पुरवठा कमी असल्यामुळे दर थेट २५० रुपयांवर पोहोचला होता. त्यामुळे चिकनच्या दराने उच्चांक गाठल्याने खवय्यांची पंचाईत झाली. आषाढ महिन्यात चांगला बाजार मिळतो, असे गृहीत धरून अनेक पोल्ट्री व्यावसायिकांनी बॉयलर कोंबडीचे संगोपन केले. त्यामुळे बाजारात बॉयलर कोंबडीची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने बाजारभाव गडगडले. याबाबत विक्रेते जावेद मिस्त्री व फिरोज मिस्त्री म्हणाले, ‘‘हैदराबाद व कोलकता येथील अंडी उपलब्ध होऊ लागल्याने शेकडा ५० रुपयांनी अंड्याचे बाजारभाव कमी झाले आहेत. घाऊक बाजारात किरकोळ साडे सहा रुपये दराने अंडी विक्री होत आहे.’’
बाजारात मोठ्या प्रमाणात बॉयलर कोंबड्यांची आवक झाली आहे. त्यामुळे भाव उतरले असून सध्या ग्राहकांना बॉयलर चिकन १६० रुपये किलो दराने विक्री केले जात आहे. ऐन आषाढ महिन्यात चिकन स्वस्त दरात मिळत असल्याने खवय्यांना सुगीचे दिवस आले आहेत.
- इसाक शेख, चिकनचे विक्रेते, कळंब
Web Title: Todays Latest District Marathi News Mpw22b00553 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..