विश्र्वेशची ‘फ्लाईंग ऑफिसर’पदी झेप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विश्र्वेशची ‘फ्लाईंग ऑफिसर’पदी झेप
विश्र्वेशची ‘फ्लाईंग ऑफिसर’पदी झेप

विश्र्वेशची ‘फ्लाईंग ऑफिसर’पदी झेप

sakal_logo
By

महाळुंगे पडवळ, ता. ३ : विठ्ठलवाडी (ता. आंबेगाव) येथील विश्वेश नितीन भालेराव (वय १८) हा ऑफिसर पदाची परीक्षेत ५७ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. त्याची इंडियन एअर फोर्समध्ये ‘फ्लाईंग ऑफिसर’ म्हणून निवड झाली आहे. विश्वेशच्या निवडीने आंबेगाव तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

संघ लोकसेवा आयोगाकडून आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये अधिकारी पदांवर नियुक्तीसाठी संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा मे महिन्यात घेण्यात आली. या परीक्षेसाठी संपूर्ण भारतातून पाच लाखाहून अधिक विद्यार्थी बसले होते. त्यातून ४६० जनांची निवड झाली. त्यामध्ये ५७ व्या क्रमांकाने विश्वेशने यश संपादन केले. त्याची इंडियन एअर फोर्समध्ये ‘फ्लाईंग ऑफिसर’ म्हणून निवड झाली. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर डेराडून येथे मुलाखत व दिल्ली येथे मेडिकल दिले. खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी येथे तीन वर्ष व त्यानंतर हैदराबाद येथील एअर फोर्स ॲकॅडमीत एक वर्ष विश्वेश प्रशिक्षण घेणार आहे. त्यानंतर इंडियन एअर फोर्समध्ये ‘फ्लाईंग ऑफिसर’ म्हणून रजू होणार आहे.
वडील नितीन वसंत भालेराव व आई स्वाती नितीन भालेराव हे दोघेही डॉक्टर म्हणून पुणे येथे कार्यरत आहेत. विश्वेशने सीबीएससीद्वारे दहावीपर्यतचे शिक्षण औध येथे घेतले असून नुकतीच तो बारावीची परीक्षा ८७ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला आहे. विश्वेशने मिळविलेल्या यशाबद्दल चिचवड येथील प्रतिभा ज्युनिअर महाविद्यालय त्याचा सन्मान करण्यात आला. तसेच नातेवाईकांकडून देखील त्याचे कौतुक करण्यात आले.


एअरफोर्समधील साहसपूर्ण जीवन, वर्दीचे आकर्षण व समाजात मिळणारा सन्मान बघता ‘डिफेन्स’मधील निवडलेले करिअर देशसेवेसाठी प्रेरणा देत आहे. जिद्द आणि चिकाटीच्या बळावर पहिल्या प्रयत्नांत विश्वेशने मिळविलेले यश कौतुकास्पद आहे.
- प्रा.वसंतराव भालेराव, विश्वेशचे आजोबा व लेखक

01043

Web Title: Todays Latest District Marathi News Mpw22b00576 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top