कळंबमध्ये दुचाकीस्वारास लुटणार अखेर जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कळंबमध्ये दुचाकीस्वारास लुटणार अखेर जेरबंद
कळंबमध्ये दुचाकीस्वारास लुटणार अखेर जेरबंद

कळंबमध्ये दुचाकीस्वारास लुटणार अखेर जेरबंद

sakal_logo
By

महाळुंगे पडवळ, ता. १६ : कळंब (ता. आंबेगाव) येथे पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर २९ मे रोजी लिफ्टचा बहाणा करून मारहाण व चाकूचा धाक दाखवून गणेश दगडू मोढवे (रा. साकोरे, ता. आंबेगाव) यांना लुटले होते. या गुन्ह्याचा तपास मंचर पोलिसांनी करून आरोपींची नावे निष्पन्न केली होती. मात्र, ते आरोपी गुंगारा देत असल्याने मिळून येत नव्हते. स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांच्या पथकाने शिताफीने तीनपैकी आरोपी शंकर चंद्रकांत तुपे (वय २४, रा. घोडेगाव, ता. नेवासा, जि. नगर) याला पकडून पुढील कार्यवाहीसाठी मंचर पोलिसांच्या ताब्यात दिले.
मोढवे हे कळंब येथे कालव्याच्या बाजूच्या रस्त्याने जात असताना तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांना बेदम मारहाण केली. तसेच, त्यांच्याकडील पाच हजार रोख रक्कम, क्रेडिटद्वारे काढलेली वीस हजार रुपये व मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना घटनेच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. सहायक पोलिस निरीक्षक किरण भालेकर, हवालदार विलास साबळे, नंदकुमार आढारी, सुदर्शन माताडे, शांताराम सांगाडे या पथकाने तपास करून आरोपींची नावे निष्पन्न करून गुन्हा उघडकीस आणला होता. परंतु, आरोपी गुंगारा देत असल्याने मिळून येत नव्हते.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्त घालत असताना गुन्ह्यातील आरोपी शिक्रापूर येथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक अशोक शेळके, गणेश जगदाळे, दीपक साबळे, राजू मोमीन, विक्रम तापकीर, संदीप वारे, अक्षय नवले, नीलेश सुपेकर या गुन्हे शाखेच्या पथकाने शिक्रापूर-चाकण रस्त्यावर सापळा रचून शंकर चंद्रकांत तुपे याला ताब्यात घेऊन मंचर पोलिसांकडे दिले. पोलीसीखाक्या दाखविल्यानंतर त्याने मित्र नीलेश केदार (रा. घोडेगाव, ता. नेवासा) याच्या समवेत गुन्हा केल्याचे कबूल केले. तसेच नारायणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे केल्याची कबुली दिली.

Web Title: Todays Latest District Marathi News Mpw22b00594 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..