फुलांचे बाजारभाव कोसळल्याने शेतकरी अडचणीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फुलांचे बाजारभाव कोसळल्याने शेतकरी अडचणीत
फुलांचे बाजारभाव कोसळल्याने शेतकरी अडचणीत

फुलांचे बाजारभाव कोसळल्याने शेतकरी अडचणीत

sakal_logo
By

महाळुंगे पडवळ, ता. २१ : मागणी कमी आणि उत्पादन अधिक झाल्याने झेंडूच्या फुलांचे बाजारभाव कोसळले. सध्या झेंडूच्या फुलांना दहा रुपये किलो दर मिळत आहे. उत्पादन खर्च वसूल होत नसल्याने आंबेगाव तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.
चास, ठाकरवाडी, महाळुंगे पडवळ, लौकी, कळंब, साकोरे, चांडोली बुद्रूक, नांदूर, टाकेवाडी, थोरांदळे, रांजणी, अवसरी खुर्द, पारगाव, शिंगवे आदी ३५ गावांतील शेतकऱ्यांनी २०० एकर क्षेत्रात झेंडूची लागवड केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अॅरा गोल्ड, गोल स्पॉट टू, भगवती, कलकत्ता आदी झेंडू फुलांच्या विविध जातींची आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून झेंडूचे पीक शेतकऱ्यांनी घेतले आहे. रोपे, मल्चिंग पेपर, ठिबक सिंचन, मजुरी, औषधे असा एकरी ४० ते ४५ हजार रुपये खर्च केला. सतत पडत असलेल्या पावसामुळे झेंडू पीक खराब होऊ नये म्हणून महागड्या औषधांची फवारणी शेतकऱ्यांना करावी लागली. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ झाली. त्यातच अल्प प्रमाणात बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी वर्ग निराश झाला आहे. मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने बाजारभाव कोसळले असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

दीड एकर क्षेत्रात नऊ हजार झेंडू फुलांच्या रोपांची लागवड केली. एक रुपया ८० पैसे दराने रोपे खरेदी केली होती. खते, औषधे, मजुरी, असा एकूण ८० ते ९० हजार रुपये खर्च झाला. आता पर्यंत चार हजार किलो फुलाची विक्री केली. फक्त २० हजार रुपये मिळाले. मजुरीचा खर्चही वसूल होत नसल्याने अडचण झाली आहे.
-राहुल बाळासाहेब थोरात, शेतकरी, लौकी

Web Title: Todays Latest District Marathi News Mpw22b00597 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..