महाळुंगे येथे बैलपोळ्यानिमित्त आजपासून विविध कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाळुंगे येथे बैलपोळ्यानिमित्त आजपासून विविध कार्यक्रम
महाळुंगे येथे बैलपोळ्यानिमित्त आजपासून विविध कार्यक्रम

महाळुंगे येथे बैलपोळ्यानिमित्त आजपासून विविध कार्यक्रम

sakal_logo
By

महाळुंगे पडवळ, ता. २५ : ‘‘श्रावणी बैलपोळ्यानिमित्त शुक्रवार (ता.२६) ते रविवार (ता.२८) या कालावधीत बैलांची मिरवणूक, कुस्त्यांचा आखाडा, संगीत भजन व लोकनाट्याचा कार्यक्रम होणार आहेत,’’ अशी माहिती सरपंच सुजाता चासकर यांनी दिली.
महाळुंगे पडवळ (ता.आंबेगाव) येथे पुणे जिल्ह्यात सर्वांत मोठा श्रावणी बैलपोळा येथे भरतो. शुक्रवार (ता.२६) सकाळी ग्रामदैवत मारुती मंदिरात अभिषेक, काठी मिरवणूक, देशभक्त हुतात्मा बाबू गेनू सैद व माजी आमदार अण्णासाहेब आवटे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर बैलांच्या मिरवणुकीला प्रारंभ होईल. यंदा मनाच्या बैलाचा मान सरपंच सुजाता सचिन चासकर यांना मिळाला. शनिवारी (ता.२७) सकाळी आठ वाजता कलगी तुऱ्याचा, दुपारी दोन वाजता दत्त मंदिराजवळ कुस्त्यांचा आखाडा होणार आहे. किसन सावळेराम सैद पाटील यांच्या स्मरणार्थ कुटुंबीयांकडून दोन किलो चांदीची गदा विजेत्या पहिलवानाला माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते देण्यात येईल. यावेळी खासदार डॉ.अमोल कोल्हे, शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, जयदेव गायकवाड यांच्या विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. रविवारी (ता.२८) सकाळी संगीत भजने व रात्री लोकनाट्याचा कार्यक्रम होणार आहे, असे यात्रा समितीचे सचिव सुभाष पडवळ यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest District Marathi News Mpw22b00603 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..