महाळुंगे परिसरात पावसाची हजेरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाळुंगे परिसरात
पावसाची हजेरी
महाळुंगे परिसरात पावसाची हजेरी

महाळुंगे परिसरात पावसाची हजेरी

sakal_logo
By

महाळुंगे पडवळ ता. ३१ : आंबेगाव तालुक्यातील साकोरे, महाळुंगे पडवळ, चास या भागात बुधवारी (ता. ३१) सायंकाळी विजेच्या कडकडाटासह ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप आले होते.
या पावसाने कळंब, नांदूर, चांडोली खुर्द, लौकी परिसराला झोडपले. अनेक ठिकाणी ओढे भरून वाहिले. शेतात पाणी साचले. टोमॅटो, फ्लॅावर, धना, मेथी, जनावरांच्या चारा पिकांचे उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांची धावपळ उडाली. साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागली. झेंडू फुलांचे मोठे नुकसान होईल, असे शेतकरी बाळासाहेब चासकर यांना सांगितले. अनेक ठिकाणी बांध फुटून गेले वाढ झालेला ऊस जमिनीलगत भुईसपाट झाला. साकोरे गाडेपट्टी येथील शेतकरी बळिराम गाडे यांच्या घरासमोरील डिंभे डाव्या कालव्याची पोट चारी फुटल्याने शेतातील माती वाहून गेली.

Web Title: Todays Latest District Marathi News Mpw22b00613 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..