पीकनिहाय तंत्रज्ञान प्रशिक्षणाला शेतकऱ्यांचा प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पीकनिहाय तंत्रज्ञान प्रशिक्षणाला शेतकऱ्यांचा प्रतिसाद
पीकनिहाय तंत्रज्ञान प्रशिक्षणाला शेतकऱ्यांचा प्रतिसाद

पीकनिहाय तंत्रज्ञान प्रशिक्षणाला शेतकऱ्यांचा प्रतिसाद

sakal_logo
By

महाळुंगे पडवळ, ता. ४ : चास-ठाकरवाडी (ता.आंबेगाव) येथे कृषी विभागामार्फत आयोजित रब्बी हंगामातील पीकनिहाय तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रमाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. दत्तात्रेय गावडे यांनी सोयाबीन पिकाचे काढणीपश्चात व्यवस्थापन, रब्बी हंगामातील कांदा पिकाचे जैविक व रासायनिक बिजप्रक्रिया, रोपवाटिका व्यवस्थापन, औषधे व खत व्यवस्थापन आदी विषयांवर मार्गदर्शन केले.

यावेळी बीबीएफ पद्धतीने व टोकन यंत्राने सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतावर भेटी देऊन पाहणी करण्यात आली. तसेच सोयाबीन पीक मळणीनंतर प्रतवारी करणारे स्पायरल सेपरेटर या यंत्राचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
आंबेगाव तालुक्याचे कृषी अधिकारी तुळशीराम चौधरी यांनी शेतकऱ्यांना प्रधानमंत्री सुक्ष्मअन्न प्रक्रिया उद्योग, ई पीक पाहणी, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, महाडीबीटी, प्रधानमंत्री पीक विमा योजना आदी विषयांवर मार्गदर्शन केले.
यावेळी विलास बारवे, ईश्वर बारवे, मंगेश बारवे, अनिल बारवे, सुदाम बारवे, ठकसेन गुंड, दिलीप पारधी, खंडू बारवे, प्रभाकर बारवे आदी शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना अधिकारी वर्गाने समर्पक उत्तरे दिली.
यावेळी सरपंच बबनराव बारवे, उपसरपंच जालिंदर काळे, चासचे उपसरपंच शिवाजी बारवे, पोलीस पाटील वैभव शेगर, सोसायटीचे माजी अध्यक्ष शिवाजी बारवे, विजय बारवे, नारायण बारवे, रामदास बारवे, दिनकर बारवे, सत्यवान बारवे, वसंत बारवे, भास्कर बारवे, छबू लोहोकरे उपस्थित होते.
मंडळ कृषी अधिकारी प्रवीण मुंढे, प्रभारी कृषी पर्यवेक्षक रोहन शेटे, कृषी सहायक विठ्ठल तळपे, धोंडिभाऊ पाबळे, पप्पू उगले, अमोल खमसे, नागेश मोहरे, उषा खैरे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
01225