साकोरे, नांदूर येथे लम्‍पीमुळे दुभत्या तीन गायींचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साकोरे, नांदूर येथे लम्‍पीमुळे दुभत्या तीन गायींचा मृत्यू
साकोरे, नांदूर येथे लम्‍पीमुळे दुभत्या तीन गायींचा मृत्यू

साकोरे, नांदूर येथे लम्‍पीमुळे दुभत्या तीन गायींचा मृत्यू

sakal_logo
By

महाळुंगे पडवळ, ता.३ : साकोरे-गाडेपट्टी (ता. आंबेगाव) येथे एक व नांदूर येथे दोन दुभत्या गाईचा लम्पी रोगाच्या प्रादुर्भावाने मृत्युमुखी पडल्या आहेत. पशुवैद्यकीय अधिकारी व्ही. एस. म्हस्के यांनी पंचनामा केला आहे.
यावेळी तलाठी अश्विनी गोरे, ग्रामसेवक वनवास वासनिक, विश्व हिंदू परिषदेचे तालुका उपाध्यक्ष गणेश गाडे, सरपंच अशोकराव मोढवे, उपसरपंच श्रुतिका गाडे, तंटामुक्ती अध्यक्ष जगन्नाथ गाडे, माजी सरपंच तुकाराम गाडे, कोतवाल गणेश मोरे उपस्थित होते. सुमारे ७५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती शेतकरी कृष्णदास गाडे यांनी दिली. नांदूर येथे राम सुदाम जाधव यांच्या मालकीच्या दोन गाईचा लम्पीने मृत्युमुखी पडल्या आहेत. ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
“महाळुंगे पडवळ, नांदूर, विठ्ठलवाडी, टाकेवाडी, चास व कळंब गावात लम्पी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. ज्या जनावरांचे लसीकरण राहिले आहे, अशा शेतकऱ्यांनी पशुवैद्यकीय दवाखान्याकडे संपर्क साधावा,’’ असे आवाहन डॉ जयप्रकाश पाचपुते यांनी केले आहे.