कळंबला नाशिक महामार्ग पाण्याखाली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कळंबला नाशिक महामार्ग पाण्याखाली
कळंबला नाशिक महामार्ग पाण्याखाली

कळंबला नाशिक महामार्ग पाण्याखाली

sakal_logo
By

महाळुंगे पडवळ, ता.१८ : कळंब (ता.आंबेगाव) येथे विजेच्या कडकडाटासह ढगफुटी झाल्याने पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली गेला होता. त्यामुळे वाहन चालकांना रस्ता पार करताना कसरत करावी लागत होती.
कळंब येथे गेल्या आठवड्यात दिवसांत दुसऱ्यांदा ढगफुटी झाल्याने ओढ्यांना मोठ्या प्रमाणावर पूर आले होते. त्यामुळे महामार्गावर पाणीच पाणी झाल्याने वाहन चालकांना रस्ता समजायला मार्ग नव्हता. त्यावेळी तिरंगा परिवाराचे उद्योजक नितीन भालेराव व त्यांच्या सहकाऱ्यांनी भर पावसामध्ये रस्त्यात उभे राहून वाहन चालकांना मार्गस्थ केले. काही ठिकाणी पुणे नाशिक महामार्गावर कमरे इतके पाणी जमा झाल्याने भीतीपोटी दुचाकी वाहन चालक पाणी कमी होण्याची वाट पाहत होते. दुचाकी जाण्यास तर मार्गच राहिला नव्हता. रस्त्याचा अंदाज न आल्याने एक ट्रक रस्त्यालगत असलेल्या ओढ्यात पलटी झाला.
शिरामळा वस्तीवरही ढगफुटीने जवळपास कमरे इतके होते. वाहनचालकांना सुरळीत मार्ग दाखवण्याचे काम उद्योजक सुनील भालेराव, मंगेश भालेराव, वरून पिंगळे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी मदत केल्याची माहिती सरपंच राजश्री भालेराव आणि उपसरपंच डॉ. सचिन भालेराव यांनी दिली. शिरामळा वस्तीवरील मोरीमध्ये घाण अडकून ओढ्याला आलेल्या पुरामुळे रस्ता पाणीमय झाला होता. जालिंदर पिंगळे ,वरूण पिंगळे, राहुल भालेराव आणि धर्मेंद्र भालेराव, दीपक भालेराव,मनोहर बांगर या तरुणांनी स्वतः पुढाकार घेऊन ओढ्याच्या मोरीची साफसफाई केली.

01279