फुलेवाडी-महाळुंगे परिसरात बिबट्याची दहशत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फुलेवाडी-महाळुंगे परिसरात बिबट्याची दहशत
फुलेवाडी-महाळुंगे परिसरात बिबट्याची दहशत

फुलेवाडी-महाळुंगे परिसरात बिबट्याची दहशत

sakal_logo
By

महाळुंगे पडवळ, ता.३ : फुलेवाडी-महाळुंगे पडवळ (ता.आंबेगाव) येथे गेल्या दोन दिवसांपासून मानववस्तीत बिबट्याचा वावर वाढला आहे. तान्हाजी लक्ष्मण चासकर व भिवाजी महादू चासकर यांच्या बंगल्याच्या अंगणात मंगळवारी (ता.१) रात्री बिबट्या ठाण मांडून बसल्याचे अनेकांनी पहिले. त्यामुळे परिसर बिबट्याची दहशत पसरली आहे.
फुलेवाडी रस्त्यालगत शेतकरी तान्हाजी चासकर व भिवाजी चासकर यांचे घर आहे. कावेरी चासकर यांनी साडेआठ वाजता बिबट्याला पाहिले. त्यांनी याबाबत नागरिकांना माहिती दिली. रात्री दहा वाजता मोटारीतून जाणाऱ्या तरुणालाही बिबट्या चासकर कुटूबियांच्या बंगल्याच्या अंगणात दिसला. त्या तरुणाने मोबाईलवर व्हिडिओ चित्रण केले आहे. पुढे गेल्यानंतर तरुणाने वस्तीवरील नागरिकांना बिबट्या दिसल्याची माहिती दिली. आरडाओरड केल्यानंतर बिबट्याने धूम ठोकली.
“आंबेगाव तालुक्यात भीमाशंकर व विघ्नहर सहकारी साखर कारखान्यामार्फत ऊस तोड सुरू झाली आहे. त्यामुळे लपण नष्ट होऊ लागल्याने बिबटे सैरभैर झाले आहेत. भक्ष्य शोधण्यासाठी मानववस्तीकडे येऊ लागले आहेत. त्यामुळे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावावा,’’ अशी मागणी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डी. के. ऊर्फ दादाभाऊ चासकर यांनी केली आहे.

01314