शेताच्या बांधावरून महाळुंग्यात मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेताच्या बांधावरून
महाळुंग्यात मारहाण
शेताच्या बांधावरून महाळुंग्यात मारहाण

शेताच्या बांधावरून महाळुंग्यात मारहाण

sakal_logo
By

महाळुंगे पडवळ, ता. ११ : फुलेवाडी-महाळुंगे पडवळ (ता. आंबेगाव) येथे शेताच्या बांधाच्या कारणावरून
तरुणास चुलते व चुलत भावांनी मारहाण केली. याप्रकरणी सुरेश साईनाथ डोके (वय ३४) यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यास चुलते चंद्रकांत बबन डोके, विशाल चंद्रकांत डोके व तुषार चंद्रकांत डोके यांनी गुरुवारी (ता. १०) दुपारी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी व जिवे मारण्याची धमकी दिली.