नदीत अस्थी विसर्जन न करता साकोरे येथे केले वृक्षारोपण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नदीत अस्थी विसर्जन न करता साकोरे येथे केले वृक्षारोपण
नदीत अस्थी विसर्जन न करता साकोरे येथे केले वृक्षारोपण

नदीत अस्थी विसर्जन न करता साकोरे येथे केले वृक्षारोपण

sakal_logo
By

महाळुंगे पडवळ, ता.२३ : मृत व्यक्तींच्या अस्थी व रक्षा नदीपात्र किंवा तीर्थक्षेत्री असलेल्या जलप्रवाहात विसर्जित करण्याची परंपरा आहे. याला फाटा देऊन साकोरे (ता.आंबेगाव) येथील पोलिस पाटील निखिल हरिश्चंद्र गाडे पाटील यांनी अस्थी नदीपात्रात विसर्जित न करता
पर्यावरण संतुलन व जलप्रदूषण रोखण्यासाठी जमिनीत खड्डे घेऊन त्यावर केशर आंब्याच्या रोपांचे वृक्षारोपण केले आहे.
साकोरे येथे नुकतेच पार्वताबाई विष्णू गाडे पाटील याचे निधन झाले. त्यांचे नातू निखिल गाडे पाटील यांनी अस्थी विसर्जित करण्याऐवजी झाडे लावण्याचा निर्णय घेतला. त्याला नातेवाईक व कुटुंबीयांनी पाठिंबा दिला. वृक्षारोपण प्रसंगी मुलगी कलावती चासकर, सून विमल गाडे पाटील, सुशाबाई गाडे पाटील, साकोरेचे ग्रामपंचायत सदस्य अनिल गाडे, अमित गाडे, प्रफुल्ल चासकर, गोटीराम गाडे आदी उपस्थित होते.
आपल्या शेतात किंवा घरासमोर खड्डा खोदून मृत व्यक्तींच्या अस्थी व रक्षा त्यात टाकाव्यात. त्यामध्ये फळझाडे त्या मृत व्यक्तीच्या स्मरणार्थ लावावीत. झाडांचे चांगले संगोपन करावे. आपल्या नातेवाइकांच्या आठवणीतून सतत मायेची सावली आपल्याला झाडे देत राहतील,’’ असे पोलिस पाटील निखिल गाडे पाटील यांनी सांगितले.

01353