फुले दांपत्याला ‘भारत रत्न’ देण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फुले दांपत्याला ‘भारत रत्न’ देण्याची मागणी
फुले दांपत्याला ‘भारत रत्न’ देण्याची मागणी

फुले दांपत्याला ‘भारत रत्न’ देण्याची मागणी

sakal_logo
By

महाळुंगे पडवळ, ता. ३० : ‘‘स्त्री शिक्षणासाठी तसेच सर्व जाती धर्मातील समाज शिक्षित व्हावा, यासाठी आयुष्यभर खडतर कष्ट महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या दांपत्याने घेतले. त्यामुळे आज विविध क्षेत्रात महिलांनी कर्तृत्व सिद्ध केले आहे. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल फुले दांपत्याला केंद्र सरकारने ‘भारत रत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार द्यावा,’’ अशी मागणी सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामभाऊ सातपुते यांनी केंद्र सरकारला पाठविलेल्या निवेदनात केली आहे.