महाळुंगे येथे गहू, मका, ज्वारी भुईसपाट

महाळुंगे येथे गहू, मका, ज्वारी भुईसपाट

महाळुंगे पडवळ, ता.७ : आंबेगाव तालुक्यातील कळंब, चांडोली बुद्रुक, लौकी, महाळुंगे पडवळ, चास, विठ्ठलवाडी, टाकेवाडी, नांदूर, साकोरे आदी गावांत सोमवारी (ता.६) सायंकाळी वादळी वाऱ्यासह आणि विजेच्या कडकडाटासह गारांचा पाऊस झाला. त्यामुळे गहू, मका व ज्वारी पिके भुईसपाट झाली आहेत. तसेच पावसामुळे द्राक्ष बागायतदार हवालदिल झाला आहे.
आंबेगाव तालुक्यात सर्वाधिक द्राक्ष बागा कळंब येथे आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्ष बागायतदारांचे नेहमीच नुकसान होत असते. त्यामुळे बहुतांशी शेतकऱ्यांनी द्राक्ष पिके काढून ऊस शेतीची लागवड केली आहे. गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत यंदा द्राक्षाला चांगले बाजारभाव होते. त्यामुळे द्राक्ष बागायतदार आनंदित होते. परंतु यंदा अवकाळी पावसाने त्याच्या आनंदावर विरजण पडते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असे
चासचे शेतकरी बाळासाहेब चासकर यांनी सांगितले.

गहू, मका, ऊस व ज्वारी पिकाचे नुकसान झाले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान होत आहे. प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करावेत.
- शेखर चिखले, सरपंच, नांदूर
-----------------------------------------------------------------------------------------------------
01616

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com