कळंबला चंदन चोरांचा सुळसुळाट

कळंबला चंदन चोरांचा सुळसुळाट

महाळुंगे पडवळ, ता.२७ : कळंब (ता.आंबेगाव) येथील ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील वाडीवस्तीवर चंदन चोरांचा सुळसुळाट झाला आहे. गणेश राजाराम भालेराव या शेतकऱ्यांचे बांधावरील व ओढ्यातील चंदनाची झाडे तोडून नेले आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.
कळंब परिसरातील वाडीवस्तीवर अधूनमधून चंदन चोरीचे प्रकार घडत असतात. ज्या ठिकाणी चंदनाची झाडे आहेत. तेथे चोरट्यांकडून झाडे कापून नेली जातात. गेल्या एक वर्षापासून या भागात चंदन चोरांचा सुळसुळाट झाला आहे. यामागे एखादी टोळी कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. परंतु, वनविभागाची यंत्रणा चोरीचा छडा लावण्यात अपयशी ठरली असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. चंदनाच्या झाडाला बाजारात चांगली मागणी असल्याने चोरट्यांनी अशी झाडे लंपास करण्याकडे लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येते.
कळंब-बागवस्ती येथे गणेश राजाराम भालेराव यांच्या शेताच्या बांधाजवळ कळंब ते बागवस्ती रस्त्यालगत तीन ते चार वर्षाचे चंदनाचे झाड होते. चंदनाचे झाड तोडल्याचे रविवारी (ता.२६) अमित रामकर यांनी पाहिले. त्यांनी सदर घटना गणेश भालेराव यांना सांगितली. सदर झाडाची १५ ते २० फुट वाढलेले होते. गेल्या वर्षी देखील अशीच चंदन चोरीची घटना घडली होती. वनविभागाने चंदन चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी शंकर भालेराव यांनी केली आहे.

01656

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com