महाळुंगेत रोहित्र जळाल्याने पिके धोक्यात

महाळुंगेत रोहित्र जळाल्याने पिके धोक्यात

महाळुंगे पडवळ, ता. २९ : महाळुंगे पडवळ-चासकरमळा (ता. आंबेगाव) येथील रोहित्र जळाल्याने शेतकऱ्यांना १८ दिवसांपासून पिकांना पाणी देता आले नाही. यामुळे सुमारे ३५ एकरामधील कांदा, बाजरी, भुईमूग आदी पिके धोक्यात आली आहेत.
चासकरमळा येथील रोहित्रावर १५ कृषी पंपांना तसेच चार घरगुती वीज जोड दिला आहे. बिघाड होऊन सोमवारी (ता.१३) रोहित्र जळून होते. याबाबत भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक अरुण चासकर, अभिजित बापू सैद, आनंद गभाले, विश्वास किसन सैद आदी शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीकडे तक्रार केली. मात्र, रोहित्रावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांनी कृषी पंपाची थकबाकी त्वरित भरावी, त्यानंतर नवीन रोहित्राची व्यवस्था करू, अशी माहिती अधिकारी वर्गाकडून दिली जाते. या परिसरात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. परिसरात सिंगल फेजचाही वीजपुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांना रात्री बाहेर पडने अवघड झाले आहे. उन्हाचा कडाका वाढल्याने पिकांना पाणी देण्याशिवाय पर्याय नाही. विजेअभावी कांदा, मेथी, कोथिंबीर, ऊस, बाजरी, मका, भुईमूग आदी पिके व जनावरांचा चारा सुकू लागला आहे. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी रोहित्राचा प्रश्न ताबडतोब मार्गी लावावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत. रोहित्राबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

पाणी मुबलक असूनही विजेअभावी पिकांना पाणी देता येत नाही. रोहित्र बसविण्यासाठी अनेकदा महावितरण कंपनीच्या कळंब व घोडेगाव येथील कार्यालयात हेलपाटे मारले. थकबाकी भरा, मग रोहित्र बसवू, असे सांगितले जाते. परंतु आम्ही नियमितपणे वीज बिल भरले आहे. मग त्यात आमचा काय दोष. पिके जळून गेल्यानंतर रोहित्र बसविणार का? महावितरण कंपनीच्या अधिकारी वर्गाने तत्काळ रोहित्राची व्यवस्था करावी.
- अभिजित सैद
-----------------------------------------------------------------------------------------------------
01664

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com