
कळंबमध्ये धावले ४८० बैलगाडे
महाळुंगे पडवळ, ता. २० : कळंब (ता.आंबेगाव) येथील श्री मुंजोबा महाराज यात्रा उत्सवानिमित्त झालेल्या शर्यतीत ४८० बैलगाडे धावले. बाळासाहेब गणपत साकोरे (हवेली) यांना घाटाचा राजा किताब देण्यात आला. शैर्यदादा सागर दंडवते यांच्या बैलगाड्याला आकर्षक बारी म्हणून गौरविण्यात आले.
प्रथम क्रमांकात एकूण ८० बैलगाडे तर द्वितीय क्रमांकात १२३ बैलगाडे धावले. विजेत्या बैलगाडा मालकांना एकूण दोन लाख २५ हजार रुपयाची रोख रक्कम बक्षीस देण्यात आली. फायनल शर्यतीत ९६ बैलगाडा संघटना, मयूर बाबाजी टेमगिरे, बाळासाहेब गणपत साकोरे, सुनील कुंडलिक वाणी, रवींद्र गीताराम थोरात (गुरुजी), विजय कोंडाजी थोरात, रवींद्र उद्धव टेमकर यांनी बक्षिस मिळविली. त्यांना चार मोटार सायकल, तीन एलईडी टीव्ही भेट म्हणून देण्यात आल्या.
कळंब येथील बैलगाडा घाटाचे उद्घाटनप्रसंगी सरपंच उषा सचिन कानडे, माजी सरपंच राजश्री नितीन भालेराव यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, उद्योजक, तरुण आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शर्यतीचे नियोजन समस्त ग्रामस्थ कळंब यांनी केले. साहेबराव आढळराव पाटील व लक्ष्मण बांगर यांनी सूत्रसंचालन केले. निशान बजावण्याचे काम पोपट पानसरे व घड्याळाचे काम नितीन थिगळे व शेखर भालेराव यांनी पाहिले.
--------------------------------------------------------------------------------------------------------
01764