नायगाव सोसायटीच्या अध्यक्षपदी संदीप खेसे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नायगाव सोसायटीच्या अध्यक्षपदी संदीप खेसे
नायगाव सोसायटीच्या अध्यक्षपदी संदीप खेसे

नायगाव सोसायटीच्या अध्यक्षपदी संदीप खेसे

sakal_logo
By

माळशिरस, ता. ३० : नायगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी संदीप मधुकर खेसे तर उपाध्यक्षपदी मनीषा दिलीप मेमाणे यांची निवड झाली. सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सर्वपक्षीय ग्रामस्थांनी एकत्र येत उभ्या केलेल्या काळभैरवनाथ सहकार पॅनेलने सर्व १३ जागा जिंकून एकहाती वर्चस्व मिळवले. यामुळे सोसायटीच्या अध्यक्षपदी कोणाला संधी मिळते याची ग्रामस्थांमध्ये उत्सुकता होती. यामध्ये सर्व संचालक व गावातील पॅनेलच्या प्रमुख मंडळींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सर्वानुमते संदीप खेसे यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी मनीषा मेमाने यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी संचालक चंद्रकांत चौंडकर, विलास खेसे, रोहिदास कड, काशिनाथ खळदकर, प्रकाश कड, संदीप चौडकर, दिलीप फरतडे, पुष्पा चौंडकर, अर्जुन पाटोळे, सरपंच बाळासो कड, दशरथ बापू खेसे, हरिदास खेसे, गणेश खेसे, संतोष गायकवाड, अल्लाउद्दीन सय्यद, नाना दरेकर, प्रवीण खेसे उपस्थित होते. निवडीनंतर अध्यक्ष संदीप शेठ व उपाध्यक्ष मनीषा मेमाणे यांचा आमदार संजय जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Web Title: Todays Latest District Marathi News Mss22b00563 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top