
पोंढे येथील ग्रामसेविकेविरूद्ध निरर्थक तक्रारी
माळशिरस, ता. ५ : पोंढे (ता. पुरंदर) येथील कार्यक्षम ग्रामसेविका शशिकला नवले यांच्यावर राजकीय हेवेदाव्यातून केलेल्या निरर्थक तक्रारीवरून विनाकारण वरिष्ठ प्रशासनाने कारवाई करू नये, अन्यथा प्रशासनाविरुद्ध आंदोलनात्मक पवित्रा घेतला जाईल, असे निवेदन पोंढे येथील ग्रामस्थांनी व ग्रामपंचायतीच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकार अमर माने यांना दिले.
ग्रामसेविका नवले या मनमानीपणे कारभार करत असल्याची तक्रार करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पोंढे येथील काही ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली होती. त्याविरोधात येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच कविता जाधव, उपसरपंच पंकज लोखंडे, माजी सरपंच नंदा वाघले, माजी उपसरपंच नवनाथ वाघले, तंटामुक्तीचे अध्यक्ष रामदास वाघले, माजी सरपंच वसंत अप्पा वाघले, संपत वाघले, सोमनाथ वाघले, ग्रामपंचायतीच्या सदस्या मंदा लोखंडे, संपत कासवेद, सोसायटीचे संचालक नामदेव वाघले, सिद्धेश्वर वाघले, श्यामराव वाघले, गजानन लोखंडे, मयूर वाघले, राजेंद्र सुनील वाघले यांच्यासह आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकारी माने यांना भेटून निवेदन दिले.
‘अधिकारी चौकशी करणार’
नवले यांच्या रूपाने गावाला प्रथमच पूर्णवेळ ग्रामसेविका मिळाल्या असून, त्या उत्तम प्रकारे काम करत असताना विनाकारण त्यांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे, असे ग्रामस्थांनी सांगितले. याबाबत गटविकास अधिकारी माने म्हणाले, ‘‘आलेल्या तक्रारी स्वीकारणे गरजेचे आहे. विस्तार अधिकारी समक्ष भेट देऊन चौकशी करेल.’’
Web Title: Todays Latest District Marathi News Mss22b00564 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..