जिजाऊंच्या लेकींनी केला राजधानी रायगड सर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिजाऊंच्या लेकींनी केला राजधानी रायगड सर
जिजाऊंच्या लेकींनी केला राजधानी रायगड सर

जिजाऊंच्या लेकींनी केला राजधानी रायगड सर

sakal_logo
By

माळशिरस, ता. ४ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून शिवसह्याद्री ट्रेकर्स पुरंदरच्या पुरुष सदस्यांसह महिलांनी स्वराज्याच्या राजधानी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे व पाचाड येथील राजमाता जिजाऊ यांच्या समाधीचे दर्शन घेतले. या वेळी जय जिजाऊ जय शिवराय, हर हर महादेवाच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला.
महिलांमध्ये शिवरायांचे विचार पोहोचवून गडकिल्ल्यावर जाऊन महिलांनी देखील दुर्ग भ्रमंती करावी यासाठी शिवसह्याद्री ट्रेकर्सचे संस्थापक अध्यक्ष संतोष यादव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसह्याद्री ट्रेकर्सने रायगड सहल आयोजित केली. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी, गडकिल्ल्यांचे प्रचंड मोठे महाद्वार, आकर्षक नक्षीकाम, दगडी पायऱ्यांची पायवाट, हिरकणी बुरूज, राणी राजवाडे, विविध तलाव, शिवरायांचे राज्याभिषेक सिंहासन, होळीचा माळ, बाजारपेठा, कडेलोट, जगदिश्वराचे मंदिर आदी ठिकाणांची माहिती या वेळी महिलांना देण्यात आली. याप्रसंगी रोप वे चा देखील आनंद घेतला. रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी राजमाता जिजाऊंच्या समाधीचे दर्शन घेऊन जयघोष केला.
या वेळी जिजाऊ महिला बचत गटाच्या अध्यक्षा राणी यादव, माळशिरसच्या उपसरपंच सारिका यादव, शरद यादव, तानाजी माने, अतुल यादव, संभाजी बोरावके, तन्मय बहिरट, वनिता यादव, मनीषा यादव, उज्ज्वला कांबळे, आशा गायकवाड, संगीता माने आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest District Marathi News Mss22b00593 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top