पुरंदर तालुक्यात पावसाची हजेरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुरंदर तालुक्यात
पावसाची हजेरी
पुरंदर तालुक्यात पावसाची हजेरी

पुरंदर तालुक्यात पावसाची हजेरी

sakal_logo
By

माळशिरस, ता. २२ : पुरंदर तालुक्यातील राजेवाडी, आंबळे, वाघापूर चौफुला परिसरात बुधवारी (ता. २२) जोरात पाऊस झाला. पेरणीयोग्य झालेल्या या पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. पावसाळा सुरु होऊन महिना होत आला, तरी अद्यापही राजेवाडी, आंबळे परिसरात अपेक्षित पाऊस झाला नव्हता. त्यामुळे पेरणी होऊ शकली नव्हती. या परिसरात शेतकरी पेरणीसाठी आवश्यक पावसाची वाट पाहत होते. त्यावेळी या परिसरात अचानक जोरात पाऊस आला. शेतात सर्वत्र पाणी साचले होते. त्यामुळे पेरणी होण्याबरोबरच उन्हाळी पिकांना देखील फायदेशीर होणार आहे. शेतकरी सुखावला आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Mss22b00608 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top