भुलेश्वराची श्रावण यात्रा उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भुलेश्वराची श्रावण यात्रा उत्साहात
भुलेश्वराची श्रावण यात्रा उत्साहात

भुलेश्वराची श्रावण यात्रा उत्साहात

sakal_logo
By

माळशिरस, ता. २२ ः श्री क्षेत्र भुलेश्वर देवस्थान येथे पंचक्रोशीतील गावातील का‌वडींप्रमाणे जिल्‍ह्यातील पुरंदर सह दौंड, शिरूर तालुक्यातील कावडींनी उत्साहात हर हर महादेवच्या गजरात श्रावणातील चौथ्या व शेवटच्या सोमवारी श्रावण यात्रेनिमित्त धार घातली. यात्रेनिमित्त दीड लाखांवर भाविकांनी दिवसभरात शिवलिंगाचे दर्शन घेतले.
रात्री बारा वाजता दक्षिण मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे व कामिनी शेवाळे यांनी माळशिरस ग्रामस्थांच्या वतीने महापूजा केली. यावेळी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, मुंबई महानगर पालिकेच्या नगरसेविका वैशाली शेवाळे, श्री क्षेत्र भुलेश्वर देवस्थानचे अध्यक्ष अरुण यादव उपस्थित होते. सकाळी सहा वाजता ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी जगताप यांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य दत्तात्रेय झुरंगे, पंचायत समितीच्या सदस्या सुनीता कोलते, माळशिरसचे आदर्श सरपंच महादेव बोरावके, युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष माऊली यादव उपस्थित होते. माळशिरस ग्रामस्थांच्या वतीने मानाची पालखी विविध रंगी फुलांनी सजविण्यात आली. मंदिरावरती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
दुपारी बारा वाजता पाण्याच्या कुंडापाशी देवास अंघोळ घालण्यात आली. महाआरती करून कावड व पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली. कावड व पालखी मिरवणूक काढण्यात आली. दुपारी साडेतीन वाजता मंदिराच्या मुख्य प्रवेशव्दारावरती कावडींची धार घालण्यात आली. मंदिरासमोर महाआरती करण्यात आली. दिवसभरात राजुरी, यवत, पोंढे, राजेवाडी, आंबळे, राहू, न्हावरे, पिंपळगाव गावच्या मानाच्या कावडींनी श्री क्षेत्र भुलेश्वर देवस्थानच्या प्रवेशद्वारावर धार घातली. भाजपचे पुरंदर तालुकाध्यक्ष गंगाराम जगदाळे यांनी दुपारी दर्शनाचा लाभ घेतला. जेजुरी पोलिस स्टेशनच्या वतीने पुरेसा बंदोबस्त देण्यात आला. वन विभागातील कमानीबाहेर अडवल्याने वाहन कोंडी झाली नाही. विश्व सामाजिक संस्था आळंदी येथील स्वयंसेवकांनी स्वच्छता मोहीम राबवली. दिवसभर अनेक भाविकांनी अन्नदान केले .

Web Title: Todays Latest District Marathi News Mss22b00642 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..