सिद्धेश्वर सोसायटीच्या अध्यक्षांचे संचालक पद रद्द | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिद्धेश्वर सोसायटीच्या 
अध्यक्षांचे संचालक पद रद्द
सिद्धेश्वर सोसायटीच्या अध्यक्षांचे संचालक पद रद्द

सिद्धेश्वर सोसायटीच्या अध्यक्षांचे संचालक पद रद्द

sakal_logo
By

माळशिरस, ता. २८ : नायगाव येथील सिद्धेश्वर विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष सदाशिव नामदेव चौंडकर यांचे संचालक पद तीन अपत्य असल्यामुळे रद्द करण्यात आले. येथील सिद्धेश्वर विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या २०२२ -२०२७ या पंचवार्षिक निवडणुकीत सदाशिव नामदेव चौंडकर हे संचालक पदी निवडून आल्यानंतर त्यांची सोसायटीच्या अध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली होती, त्यानंतर ११ जुलै रोजी नायगाव येथील योगेश श्रीपती घाटे व श्रीपती पांडुरंग घाटे यांनी त्यांना २००१नंतर दोन पेक्षा अधिक अपत्य असल्याने त्यांच्या विरोधात संचालक पद रद्द करण्याबाबत अर्ज सहाय्यक निबंधक कार्यालयास दिला होता. त्यानुसार दोन्ही गटांना वेळोवेळी तारखा देऊन पुरावे सादर करावयास सांगितले. सदाशिव चौंडकर हे गैरहजर राहिल्याने त्यांचे काही म्हणणे नाही हे ग्राह्य धरून व त्यांच्या विरोधात घाटे व त्यांच्या वकिलांनी सादर केलेले दोन पेक्षा अधिक अपत्य दाखल्याच्या आधारावर त्यांचे संचालक पद रद्द करण्यात येत असल्याचा आदेश सहाय्यक निबंधक श्रीकांत लोखंडे यांनी दिला. यामुळे सदाशिव चौंडकर यांना आता संचालक पद रद्द झाल्याने अध्यक्ष पदावरून पाय उतार होवे लागणार आहे.

गावातील राजकीय वातावरण पुन्हा तापणार
येथील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्यावर गावात शांत वातावरण होते. मात्र गावातील दोन्ही सोसायटीची निवडणूक लढून झाल्याने गावचे राजकीय वातावरण ढवळून निघाले. ते अजून निवळते तोच सोसायटीच्या अध्यक्षांना अशा प्रकारे पायउतार होवे लागल्याने गावचे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापणार हे नक्की.

Web Title: Todays Latest District Marathi News Mss22b00643 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..