पिसर्वेत बँक ऑफ इंडियातर्फे बचत गटांना कर्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिसर्वेत बँक ऑफ इंडियातर्फे बचत गटांना कर्ज
पिसर्वेत बँक ऑफ इंडियातर्फे बचत गटांना कर्ज

पिसर्वेत बँक ऑफ इंडियातर्फे बचत गटांना कर्ज

sakal_logo
By

माळशिरस, ता, १० : पिसर्वे (ता पुरंदर) येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेतर्फे महिला आर्थिक सबलीकरणासाठी दोन बचत गटांना प्रत्येकी पाच लाखांचे कर्ज वाटप, उद्योग व्यवसायासाठी मुद्रा लोन अंतर्गत दोघा युवकांना प्रत्येकी पन्नास हजारांचे कर्जवाटप, शैक्षणिक कर्ज योजने अंतर्गत साडे पाच लाखांचे कर्ज वितरण तर सुवर्ण कर्ज योजनेतून सुमारे सव्वा चार लाखांचा वित्तपुरवठा बँकेच्या वर्धापनदिनानिमित्त करण्यात आला.
बचत गटाविषयक तालुक्यांत प्रभावी काम करणाऱ्या हेल्पो संघटनेच्या समन्वयक शमीवेम शेख, माजी सरपंच शांताराम कोलते, सदस्य चंद्रकांत कोलते, शाखा अधिकारी अभिलाषा जानोरिया यांच्या प्रमुख उपस्थितीत शाखेत हा कार्यक्रम पार पडला.
बचत गटांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने शमीम शेख यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. ग्राहकांच्या वतीने मचिंद्र विष्णू कोलते यांनी बँक वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी रमाबाई गटाच्या वंदना वाघमारे, अंजली वाघमारे, गणेशा गटाच्या सुनंदा राहुल कोलते, सुनंदा विलास ताकवले यांसह दोन्हीं गटांच्या महिला, श्रीरंग वाईकर, श्यामराव निकम, कैलास कोलते, हेल्पो संस्थेच्या पूजा झेंडे, संतोष कामठे, नीलेश भापकर, मधुकर देवकर, रोहित कोलते यांसह अनेक बँक ग्राहक यावेळी उपस्थित होते. शाखा अधिकारी अभिलाषा यांनी सर्वांचे आभार मानले. अधिकारी मच्छिंद्र नवले, लियाकत शेख, दिलीप गिते, रूपेश वाघमारे, दत्ता वाघमारे, अनिल शेंडगे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. हेमंत ताकवले यांनी सूत्रसंचालन केले.
01026

Web Title: Todays Latest District Marathi News Mss22b00649 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..