माळशिरस येथे ड्रोनद्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माळशिरस येथे ड्रोनद्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक
माळशिरस येथे ड्रोनद्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक

माळशिरस येथे ड्रोनद्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक

sakal_logo
By

माळशिरस, ता. १२ : येथे (ता पुरंदर) महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र बारामती व ग्रामपंचायत माळशिरस यांचे संयुक्त विद्यमाने ड्रोनद्वारे फवारणी प्रात्यक्षिक व ऊस पीक चर्चा सत्राचे आयोजन केले होते.
कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ संतोष गोडसे यांनी ड्रोनद्वारे फवारणी प्रात्यक्षिक व कृषी विज्ञान केंद्र बारामती मार्फत शेतकऱ्यांसाठी उपलब्ध सुविधा याबाबत मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी सूरज जाधव यांनी कृषी विभागामार्फत ड्रोनसाठी मिळणारे अर्थसहाय्य तसेच प्रक्रिया उद्योगासाठी शासनाच्या योजना याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन प्रभारी कृषी पर्यवेक्षक सचिन जगताप यांनी केले. कार्यक्रमास मंडल कृषी अधिकारी गणपत वाघमारे, कृषी सहायक कृष्णात खोमणे, माळशिरस गावचे माजी उपसरपंच गोकूळ यादव, युवा शेतकरी बचत गटाचे सचिव महेश यादव, कृषी मित्र सोपान यादव, प्रगतशील शेतकरी दीपक यादव, दत्तात्रेय यादव, नायगाव येथील प्रगतशील शेतकरी संदीप खेसे, हरिदास खेसे व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

01078