भुलेश्वर येथे शिबिरात ८० जणांचे रक्तदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भुलेश्वर येथे शिबिरात ८० जणांचे रक्तदान
भुलेश्वर येथे शिबिरात ८० जणांचे रक्तदान

भुलेश्वर येथे शिबिरात ८० जणांचे रक्तदान

sakal_logo
By

माळशिरस, ता. २१ : माळशिरस येथील भुलेश्वर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासानिमित्त शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान भुलेश्वर पंचक्रोशी, सरसेनापती हंबीरराव मोहिते गोशाळा व होय हिंदूच या संघटनेच्या माध्यमातून रक्तदान शिबिर आयोजित केले होते. यामध्ये ८० जणांनी रक्तदान केले, कार्यक्रमाचे उद्‍घाटन सरसेनापती हंबीरराव मोहिते गोशाळेचे अध्यक्ष पंडित मोडक यांच्या उपस्थित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. या वेळी सूरज भगत, आकाश वाघले, अण्णासाहेब चौधरी, संकेत वाघले, नितीन हेंद्रे, वैभव वाघले, सुनील वाघले, विपुल बोरावके, अमोल लोखंडे, रोहित गायकवाड, अभिजित आढाव, रंजित उमाप, अजिंक्य दोरगे, करण दोरगे, साहिल वाघले, स्वीकार गायकवाड, अनिकेत वाघले, सूरज वाघले, गणेश वाघले, अभिषेक यादव उपस्थित होते. या वेळी प्रत्येक रक्तदात्यास शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांची प्रतिमा, रक्तदान केल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले.