माळशिरस सोसायटीसाठी 
आज मतदानासाठी चुरस

माळशिरस सोसायटीसाठी आज मतदानासाठी चुरस

माळशिरस, ता. २५ : माळशिरस विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी मतदान (ता. २६) होत असून, शिवशंभो सहकार पॅनेल व श्री भुलेश्वर सहकार परिवर्तन पॅनेलमध्ये अत्यंत अटीतटीची लढत होत आहे.
माजी सरपंच व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अरुण यादव यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी व शिवसेनेने एकत्र येत शिवशंभो सहकार पॅनेलच्या माध्यमातून तेरा उमेदवार उभे केले आहेत, तर त्यांच्या विरोधात सरपंच महादेव बोरावके, माजी सरपंच एकनाथ यादव व युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माउली यादव यांच्या नेतृत्वाखाली श्री भुलेश्वर सहकार परिवर्तन पॅनेल उभा करून एकास एक तेरा उमेदवार उभे केले आहेत. सध्या सोसायटीवर अरुण यादव यांचे पूर्ण वर्चस्व होते. मात्र, या निवडणुकीत त्यांच्याबरोबर असणारे अनेक जण विरोधात गेल्याने निवडणूक मोठी रंगतदार झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com