स्मार्ट मीटरमध्ये बारामतीतील पोंढे अग्रेसर

स्मार्ट मीटरमध्ये बारामतीतील पोंढे अग्रेसर

Published on

माळशिरस, ता. १ : बारामती सर्कलमधील सहा तालुक्यांमध्ये पुरंदरच्या पोंढे या गावातील सर्व वीज ग्राहकांकडे स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत. यामुळे हे गाव स्मार्ट मीटरमध्ये अग्रेसर ठरले आहे.
बारामती सर्कलमध्ये बारामती सह इंदापूर, दौंड, शिरूर, पुरंदर, भोर या तालुक्यांचा समावेश होतो. सध्या सर्वच ठिकाणी स्मार्ट मीटर बसवून वीजेसंदर्भात ग्राहकांना येणाऱ्या अडचणींची सोडवणूक करण्याचा महावितरणचा प्रयत्न आहे. यामुळे बारामती सर्कलमधील सर्वच तालुक्यात हे काम जोमाने सुरू आहे. यामध्ये पुरंदर तालुक्यातील सासवड उपविभागामधील राजेवाडी सेक्शनचे पोंढे हे गाव १०० टक्के स्मार्ट मीटरने परिपूर्ण झाले. या गावातील सर्व ग्राहकांचे घरगुती वीज जोडचे मीटर हे स्मार्ट झाले आहेत.
सासवड विभागाचे उपकार्यकारी अभियंता गणेश चांदणे व राजेवाडी शाखेचे प्रमुख जीवन ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मार्ट मीटर बसविण्याचे काम चालू होते. यामध्ये सासवड विभागाचे प्रमुख श्रेयस देशमुख, सुहास पाटील, पांडुरंग तासकर यांचाही सहभाग होता. यामुळे आता वीज बिलाबाबतच्या समस्या दूर होण्यास मदत होणार आहे.

स्मार्ट मीटरचे फायदे...
स्मार्ट मीटर धारकांना दिवसा वीज वापरावर प्रति युनिट 80 पैसे सवलत आहे.
मीटरचे रीडिंग हे स्वयंचलित आहे त्यामुळे अचूक बिल येणार आहे.
वीज बिल दुरुस्तीचा खर्च टळणार आहे.
ग्राहकांना प्रत्येक तासाला महाविद्युत अॅपद्वारे आपले मीटरचे रीडिंग पाहता येणार आहे.
स्मार्ट मीटर हे विनामूल्य लावले जात आहे, ग्राहकांना त्याचा कुठलाही भुर्दंड नाही.
ज्यांच्याकडे सौरऊर्जा प्रकल्प आहे, त्यांच्या वापरलेल्या व शिल्लक राहिलेल्या विजेचा लेखाजोखा कळणार.
स्मार्ट मीटरला दहा वर्षाची वॉरंटीदेखील आहे.
अॅपद्वारे घरबसल्या विजेसंबंधित तक्रारीचे निवारण होणार आहे.


स्मार्ट मीटर हे विनामूल्य बदलले गेले आहेत. त्यापासून कुठलेही अतिरिक्त वीज बिल येत नाही. ज्या ग्राहकांच्या घरगुती वायरिंगमध्ये अदलाबदल झाले आहेत त्याच ग्राहकांना अतिरिक्त वीज बिल आले आहे. यामुळे कोणीही मीटरमध्ये छेडछाड करू नये. मीटर बसविण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना नागरिकांनी साहाय्य करावे.
- गणेश चांदणे, उपकार्यकारी अभियंता, सासवड विभाग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com