नारायणगावात विश्वबंधुत्वासाठी दुवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नारायणगावात विश्वबंधुत्वासाठी दुवा
नारायणगावात विश्वबंधुत्वासाठी दुवा

नारायणगावात विश्वबंधुत्वासाठी दुवा

sakal_logo
By

नारायणगाव, ता.५: रमजान ईदनिमित्त मुस्लिम बांधवांनी येथील ईदगाह मैदानात सामुदायिक नमाज पठण केले. यावेळी शांती, सद्भाव व विश्वबंधुत्वासाठी दुवा मागण्यात आली. मौलाना अब्दुलबारी यांच्या मार्गदर्शनाखाली नमाज पठण व दुवा पठण करण्यात आले. नारायणगाव येथे ईदगाह, सुन्नी जामा मस्जिद, शाही मस्जिद या ठिकाणी सामूहिक नमाज पठण झाले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात नारायणगाव ग्रामस्थांच्या वतीने सरपंच योगेश पाटे यांनी व सहाय्यक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. यावेळी उपसरपंच आरिफ आतार, तंटामुक्तीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर औटी, पोलिस उपनिरीक्षक सनील धनवे, विनोद धुर्वे, विश्वस्त एजाज आतार, मेहबूब काझी, गफूरभाई तांबोळी, हाजी नुरमोहम्मद मणियार, सलीम मोमीन, फरीद कुरेशी आदी उपस्थित होते. नमाज पठणानंतर उपसरपंच आरिफ आतार यांनी हिंदू मुस्लिम बांधवांना शिरखुर्मा वाटप केले. सूत्रसंचालन मेहबूब काझी यांनी केले. आभार गफूरभाई तांबोळी यांनी मानले.

Web Title: Todays Latest District Marathi News Nar22b01249 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top