तमाशाचा व्यवस्थापक पैसे घेऊन फरारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तमाशाचा व्यवस्थापक पैसे घेऊन फरारी
तमाशाचा व्यवस्थापक पैसे घेऊन फरारी

तमाशाचा व्यवस्थापक पैसे घेऊन फरारी

sakal_logo
By

नारायणगाव, ता. ९ : स्वाती शेवगावकरसह अंजली शेवगावकर या तमाशाचा व्यवस्थापक एस. के. शेख हा तमाशा कलावंतांच्या पगाराचे पैसे न देता तमाशा कार्यक्रमाचे पैसे घेऊन फरारी झाला आहे. त्यामुळे सुमारे चाळीस तमाशा कलावंत, बिगारी व फडमालकीण यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या प्रकरणी तमाशा कलावंतांच्या वतीने नंदिनी विजय शिंदे यांनी नारायणगाव (ता. जुन्नर) पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.
नारायणगाव हे तमाशाचे केंद्र आहे. यात्रा-जत्रेतील तमाशा कार्यक्रमाच्या आगाऊ नोंदणीसाठी येथील तमाशा पंढरीत स्वाती शेवगावकरसह अंजली शेवगावकर या फडाची राहुटी एक महिन्यापूर्वी उभारली होती. या तमाशात फडमालकीण स्वाती शेवगावकर यांच्यासह सुमारे चाळीस कलावंत व बिगारी आहेत. तमाशा कार्यक्रमाचे पैसे व्यवस्थापक एस. के. शेख हा जमा करत असे. मागील एक महिना तमाशा कलावंत या तमाशात काम करत आहेत. ६ मे २०२२ रोजी तमाशा हंगाम संपला व त्यानंतर हिशोब करून तमाशा कलावंत व कामगारांच्या पगाराचे पैसे न देताच व्यवस्थापक शेख पैसे घेऊन फरारी झाला. त्यामुळे तमाशा कलावंत व फडमालकीण स्वाती शेवगावकर यांचा मुक्काम सध्या नारायणगाव येथे उभारलेल्या राहुटीत असून, मागील तीन दिवसांपासून हे सर्व जण वडापाव खाऊन उदरनिर्वाह करत आहेत.

व्यवस्थापक एस. के. शेख हा गुन्हेगार पार्श्वभूमीचा आहे. पैशासाठी या पूर्वी त्याने मला अनेक वेळा मारहाण केली आहे. त्याला राजकीय वरदहस्त असल्याने मला न्याय मिळत नाही. तो पैसे घेऊन फरारी झाल्याने कलावंत, भाड्याने घेतलेल्या गाड्या व इतर साहित्य याचे पैसे कसे द्याचे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
- स्वाती शेवगावकर, फडमालकीण

Web Title: Todays Latest District Marathi News Nar22b01259 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top