रुग्णवाहिकेच्या धडकेत दुचाकीस्वार महिला ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रुग्णवाहिकेच्या धडकेत
दुचाकीस्वार महिला ठार
रुग्णवाहिकेच्या धडकेत दुचाकीस्वार महिला ठार

रुग्णवाहिकेच्या धडकेत दुचाकीस्वार महिला ठार

sakal_logo
By

नारायणगाव, ता. १० : येथील पुणे-नाशिक महामार्गावर भरधाव जाणाऱ्या रुग्णवाहिकेची स्कुटीला धडक बसून झालेल्या अपघातात स्कुटी चालक विवाहिता काजल किशोर टाव्हरे (वय २७, रा. निरगुडसर, ता. आंबेगाव) यांचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (ता. ९) रात्री सव्वासात वाजता झाला.
वाहतूक नियमांचे पालन न करता भरधाव वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी रुग्णवाहिका चालक रमेश सुखदेव पानसरे (रा. वैद्यवाडा, बुधवार पेठ, जुन्नर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.
काजल टाव्हरे यांची बहिण वारूळवाडी येथील शुभम विश्व सोसायटीत राहात आहे. बहिणीला भेटण्यासाठी त्या वारूळवाडी येथे आल्या होत्या. रात्री पुन्हा निरगुडसर येथे जात असताना येथील पुणे-नाशिक महामार्गावर ‘हॉटेल निलायम’समोर पुणे बाजूकडून भरधाव नारायणगावच्या दिशेने येत असलेल्या १०८ रुग्णवाहिकेची स्कुटीला धडक बसली. या अपघातात काजल यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी शिवाजी शिंदे यांनी नारायणगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

Web Title: Todays Latest District Marathi News Nar22b01260 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top