नारायणगावात गोळीबार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नारायणगावात गोळीबार
नारायणगावात गोळीबार

नारायणगावात गोळीबार

sakal_logo
By

नारायणगाव, ता. ११ : येथील ‘हॉटेल कपिल बिअर बार’मध्ये दोन गटात झालेल्या वादातून चाकू व पिस्तुलसारख्या शस्त्राचा वापर करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी नारायणगाव पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांसह चौदा जणांवर गुन्हा दाखल केला. त्यापैकी दोन जणांना अटक केली आहे. ही घटना मंगळवारी (ता. १०) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.
या प्रकरणी एका गटातील मन्या पाटे, गणपत गाडेकर (रा. नारायणगाव, ता. जुन्नर) यांच्यासह इतर चार ते पाच अज्ञात साथीदार व दुसऱ्या गटातील आकाश ऊर्फ बाबू कोळी (रा. घोडेगाव, ता. आंबेगाव) यांच्यासह चार अल्पवयीन मुले व त्यांचे अज्ञात दोन साथीदार यांच्यावर दहशत निर्माण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी मन्या पाटे व आकाश कोळी यांना अटक केली असून, इतर आरोपी फरारी आहेत.
आरोपी मंगळवारी रात्री नारायणगाव येथील हॉटेल कपिल बिअर बारमध्ये दोन स्वतंत्र टेबलवर जेवण करण्यासाठी बसले होते. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास तात्कालिक कारणावरून दोन गटातील तरुणांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी मन्या पाटे, गणपत गाडेकर व त्यांच्या इतर चार ते पाच साथीदारांनी धारदार चाकूने आकाश कोळी व त्याच्या साथीदारांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आकाश कोळी याच्या साथीदारांनी पिस्तुलातून मन्या पाटे याच्या दिशेने पिस्तुलातून एक राउंड फायर करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपी पसार झाले. या प्रकरणी फौजदार सनील धनवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नारायणगाव पोलिसांनी दोन्ही गटातील आरोपीवर गुन्हा दाखल केला. त्यापैकी दोन जणांना अटक केली.

Web Title: Todays Latest District Marathi News Nar22b01261 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top