
जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींसह सात जणांना अटक
नारायणगाव, ता.१२ : येथील हॉटेल कपिल बियर बारमध्ये दोन गटात झालेल्या वादातून चाकू व पिस्तुलसारख्या प्राणघातक शस्त्राचा वापर करून जीवे मारण्याचा प्रयत्न करून फरार झालेल्या मुख्य आरोपीसह सात जणांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखा, नारायणगाव पोलिस व वापी (गुजरात) पोलिस पथकाला यश आले आहे. यामध्ये चार अल्पवयीन मुले आहेत, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.
याप्रकरणी मनीष ऊर्फ मन्या विकास पाटे (वय २५ रा.डिंबळेमळा नारायणगाव, ता.जुन्नर), आकाश ऊर्फ बाबू दिलीप कोळी (वय २१), अभिषेक दिलीप कोळी (वय १८, दोघेही रा. वारूळवाडी, ता.जुन्नर, मुळ चावडी चौक, घोडेगाव, ता.आंबेगाव) या अल्पवयीन मुलांना जुन्नर न्यायालयात हजर केले असता त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यांची येरवडा येथील बालसुधारगृहात रवानगी केली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
मंगळवारी (ता.१०) रात्री मन्या पाटे, गणपत गाडेकर यांच्यासह इतर चार ते पाच अज्ञात साथीदार व दुसऱ्या गटातील आकाश ऊर्फ बाबू कोळी, अभिषेक कोळी यांच्यासह चार अल्पवयीन मुले व त्यांचे अज्ञात साथीदार यांच्यावर दहशत निर्माण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी नारायणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. घटनेनंतर कोळी गटातील आरोपी मुंबई, वापी (गुजरात) येथे फरार झाले होते. या पैकी मुख्य आरोपी अभिषेक कोळी याला वापी पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून घटनेत वापरलेले पिस्तूल जप्त केले आहे.
Web Title: Todays Latest District Marathi News Nar22b01263 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..