नारायणगावात कामगाराचा संशयास्पद मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नारायणगावात कामगाराचा संशयास्पद मृत्यू
नारायणगावात कामगाराचा संशयास्पद मृत्यू

नारायणगावात कामगाराचा संशयास्पद मृत्यू

sakal_logo
By

नारायणगाव, ता.१२ : येथील पुणे-नाशिक महामार्गा लगत असलेल्या जयहिंद टायर वर्क्स या दुकानात काम करणाऱ्या मोहम्मद अब्बास (वय २५, सध्या राहणार नारायणगाव, मूळ बिहार) या कामगार तरुणाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. घटनेनंतर मृत तरुणाचा साथीदार कामगार फरार झाला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.
मोहम्मद अब्बास व कुमार (पूर्ण नाव माहीत नाही) हे दोघे येथील मनोज रामकृष्ण कोनंगत यांच्या जयहिंद टायर वर्क्स या दुकानात कामास होते. ते दोघे दुकानातील खोलीत रहात होते. दोघांमध्ये किरकोळ कारणावरून नेहमी वाद होत असत. आज सकाळी मोहम्मद अब्बास याचा मृतदेह दुकानातील खोलीत आढळून आला, अशी माहिती ताटे यांनी दिली.

Web Title: Todays Latest District Marathi News Nar22b01264 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top