ज्ञानदा कन्या शाळेमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ज्ञानदा कन्या शाळेमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप
ज्ञानदा कन्या शाळेमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप

ज्ञानदा कन्या शाळेमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप

sakal_logo
By

नारायणगाव, ता.१६ : श्री लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने येथील ज्ञानदा कन्या शाळेतील ४४ विद्यार्थिनींना शालेय गणवेश, स्कूल बॅग व शालेय उपयोगी देण्यात आले. त्याचे वाटप आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते करण्यात आले, अशी माहिती लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अशोकशेठ गांधी यांनी दिली.
या वेळी युवा नेते अमित बेनके, लोकसेवा प्रतिष्ठानचे सुभाष संकलेचा, राम दळवी, सुरेश वऱ्हाडी, प्रशांत शहा, राजश्री बोरकर, देविदास ताजवे, संतोष जाधव, प्रा. लहू गायकवाड, प्रा.श्रीकांत फुलसुंदर, सतीश कोल्हे, माऊली लोखंडे, प्रा.घोलप दिलदीप बांगा, संपत शिंदे, शशिकांत लोढा, माऊली लोखंडे आदी उपस्थित होते. आमदार बेनके म्हणाले येथील श्री लोकसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून ''एक हात मदतीचा'' या उपक्रमांतर्गत गरीब रुग्णांना उपचारासाठी मदत, निराधार व्यक्तींना जेवणाचे डबे, विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, पूरग्रस्तांना मदत केली जात आहे.
यावेळी अध्यक्ष गांधी म्हणाले, श्री लोकसेवा प्रतिष्ठान लोकसहभागातून मागील पंचवीस वर्ष विविध सामाजिक उपक्रम राबवीत आहेत.

02579

Web Title: Todays Latest District Marathi News Nar22b01346 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..