
बाजार समितीच्या विकासात काळे यांचे योगदान
नारायणगाव, ता.१८ : ''''जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकासात आणि प्रगतीमध्ये माजी सभापती संजय काळे यांचे योगदान मोठे आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी नारायणगाव येथे सुरू केलेला टोमॅटो उपबजार राज्यात अग्रेसर ठरला आहे,'''' असे मत आघाडीचे टोमॅटो व्यापारी जालिंदर थोरवे यांनी व्यक्त केले.
जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील टोमॅटो व धना, मेथी उपबाजारातील व्यापारी, अडते, बाजार समितीचे कर्मचारी, टोमॅटो उत्पादक शेतकरी यांच्या वतीने वाढदिवसानिमित्त माजी सभापती काळे यांचा सत्कार करण्यात आला.
नारायणगाव (ता. जुन्नर) येथील कार्यक्रमात व्यापारी कमलाकर वाजगे म्हणाले, की माजी सभापती काळे यांनी येथील उपबजारात शेतकरी, व्यापारी, कामगार यांच्यासाठी अल्पदरात भोजन व्यवस्था केली आहे. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्यात काही बाजार समित्या अडचणीत असताना काळे यांच्या धोरणामुळे जुन्नर बाजार समितीच्या आर्थिक उलाढालीत वाढ होत आहे.
सूत्रसंचालन उपसचिव शरद घोंगडे यांनी केले.
या वेळी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव रूपेश कवडे, उपसचिव शरद घोंगडे, कार्यालयीन प्रमुख केतन रुकारी, प्रशांत महाबरे, दीपक मस्करे, शैलेश नायकवडी, व्यापारी योगेश घोलप, कमलाकर वाजगे, जालिंदर डुकरे, गुलाब डुकरे अभय कोठारी, अजित भुजबळ, तुषार शिंदे आदी उपस्थित होते.
माजी सभापती काळे यांनी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव, आळेफाटा, जुन्नर, ओतूर उपबाजारात सिमेंट काँक्रिटचे रस्ते, पिण्याचे पाणी, लिलाव शेड आदी पायाभूत सुविधा निर्माण केल्या. नारायणगाव येथे खुल्या पद्धतीने टोमॅटो उपबाजार सुरू केला. यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत येथील टोमॅटो विक्रीसाठी रवाना होत आहे. या मुळे राज्यातील इतर बाजाराच्या तुलनेत येथील टोमॅटो व भाजीपाल्याला वाढीव भाव मिळत आहे. यासाठी माजी सभापती काळे यांनी नेहमी शेतकरी हिताला प्राधान्य दिले.
-जालिंदर थोरवे, व्यापारी
02583
Web Title: Todays Latest District Marathi News Nar22b01348 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..