वडज देवस्थानच्या अश्‍वाचा छळामुळे मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वडज देवस्थानच्या अश्‍वाचा छळामुळे मृत्यू
वडज देवस्थानच्या अश्‍वाचा छळामुळे मृत्यू

वडज देवस्थानच्या अश्‍वाचा छळामुळे मृत्यू

sakal_logo
By

नारायणगाव, ता. २५ : वडज (ता. जुन्नर) येथील श्री कुलस्वामी खंडेराय देवस्थान ट्रस्टच्या पवित्र अश्वाचा मृत्यू प्रशिक्षकाच्या अमानुष छळामुळे झाला आहे. या घटनेला देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त, मुख्य व्यवस्थापक व प्रशिक्षक जबाबदार आहेत. या प्रकरणी चौकशी करून संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार वडजचे सरपंच सुनील चव्हाण, माजी उपसरपंच सुभाष चव्हाण यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.
तक्रार अर्जात म्हटले आहे की, भाविक तानाजी शिंदे यांनी सात वर्षापूर्वी श्री कुलस्वामी खंडेराय देवस्थान ट्रस्टला अश्व(घोडा) दान केला होता. देवस्थान ट्रस्टने ग्रामस्थांना विश्वासात न घेता हा घोडा परस्पर नारायणगाव येथील प्रशिक्षक रमेश पवार यांच्याकडे नाच शिकवण्यासाठी दिला. प्रशिक्षण देता असताना पवार यांनी घोड्याचा अमानुष छळ केला. त्यामुळे घोड्याचा मृत्यू झाला. या बाबतची माहिती ग्रामस्थांना न देता शवविच्छेदन न करता विश्वस्तांनी घोड्याचा परस्पर अंत्यविधी करून टाकला. तरी या प्रकरणी चौकशी करून देवस्थान ट्रस्टचे नऊ विश्वस्त, मुख्य व्यवस्थापक व प्रशिक्षक यांच्यावर प्राणी छळ कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

श्री कुलस्वामी खंडेराय देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त विजय चव्हाण व विवेक चव्हाण म्हणाले, ‘‘सर्व विश्वस्तांच्या परवानगीने अश्व प्रशिक्षणासाठी नारायणगाव येथे दिला होता. घोडा चावत होता. हृदयविकाराने घोड्याचे निधन झाले असल्याचे स्थानिक पशुवैद्यक डॉक्टरांनी डॉक्टरांनी विधान केले होते. त्यानंतर अश्वाचा अंत्यविधी केला. घोडा प्रशिक्षणासाठी देण्यामागची भावना शुद्ध होती. मात्र, विश्वस्तांना बदनाम करण्यासाठी या घटनेचे काही जणांनी राजकारण सुरू केले आहे. या प्रकरणी होणाऱ्या चौकशीसाठी आम्ही तयार आहोत.’’

Web Title: Todays Latest District Marathi News Nar22b01360 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..