
जयहिंद अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ अभ्यासक्रम
नारायणगाव, ता. २७ : अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने कुरण (ता. जुन्नर) येथील जयहिंद अभियांत्रिकी महाविद्यालयाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स M. E.(AI&DS) हा नवीन पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी मान्यता दिली आहे.
या अभ्यासक्रमासाठी या वर्षी बारा विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या विषयातील पदवीधारक विद्यार्थी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पात्र आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला संलग्नित व ग्रामीण भागात असलेल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये अशा प्रकारचा हा पहिलाच अभ्यासक्रम आहे. याबाबत प्राचार्य डॉ. दामोदर गरकल यांनी माहिती दिली.
ग्रामीण भागातील तसेच राज्यातील विद्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI&DS) या विषयांमध्ये करिअरच्या संधी निर्माण व्हाव्यात, हा या अभ्यासक्रमामागचा उद्देश आहे.
प्राचार्य डॉ. गरकल म्हणाले, ‘‘अनेक उपकरण, यंत्र, इंटेलिजंट व्हेईकलमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्सचा वापर अपरिहार्य झालेला आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर डेटा सायंटिस्ट, आर्किटेक इंजिनिअर, बिझनेस इंटेलिजन्स डेव्हलपर, मशिन लर्निंग इंजिनिअर, मशिन लर्निंग आर्किटेक्ट, प्रिन्सिपल डेटा सायंटिस्ट, प्रॉडक्ट मॅनेजर अशा पदांवर काम करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.’’
Web Title: Todays Latest District Marathi News Nar22b01364 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..