राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान आता थेट बांधावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान आता थेट बांधावर
राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान आता थेट बांधावर

राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान आता थेट बांधावर

sakal_logo
By

नारायणगाव, ता.९ : ''''कृषी विज्ञान केंद्र व मॅग्नेट सोसायटी यांच्यात शेतीमालाच्या मूल्यवर्धनाबाबतचा ''सेंटर फॉर एक्सलन्स'' बाबतचा सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे शेतकऱ्यांना शेती क्षेत्रातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान थेट बांधावर उपलब्ध होणार असून शेत मालाचे काढणी पश्चात होणारे नुकसान टाळून मूल्यवर्धनातून शेतमालाला जास्तीचा बाजारभाव मिळण्यास मदत होणार आहे,'''' अशी माहिती कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष, कृषिरत्न अनिल मेहेर यांनी दिली.

नारायणगाव (ता.जुन्नर) येथे झालेल्या कार्यक्रमात मेहेर म्हणाले, की महाराष्ट्र अग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) हा एशियन डेव्हलपमेंट बँक आर्थिक सहायीत राज्य शासनाचा पथदर्शी प्रकल्प महाराष्ट्रात सुरू झाला आहे. या प्रकल्पांतर्गत कृषी विज्ञान केंद्राची ''सेंटर फॉर एक्सलंस'' म्हणून निवड झाली आहे.''मॅग्नेट'' सोबत झालेल्या करारामुळे शेतकऱ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ञांनामार्फत चांगल्या कृषी पद्धतीवर अवलंबित उत्पादन तंत्रज्ञान, काढणीपश्चात हाताळणी, उत्तम कृषी सेवांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्यासाठी फायदा होईल. मॅग्नेट या पथदर्शी प्रकल्पांतर्गत या भागातील केळी, सीताफळ, पेरू, डाळिंब, हिरवी मिरची, भेंडी आणि फुले (झेंडू, शेवंती) या पिकांची निवड करण्यात आली आहे.या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मूल्य शृंखला विकसित करण्यास मदत होईल.
कृषी विज्ञान केंद्र सभागृहात झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे सर व्यवस्थापक तथा ‘मॅग्नेट’चे प्रकल्प संचालक दीपक शिंदे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. प्रशांत शेटे, शास्त्रज्ञ राहुल घाडगे, भारत टेमकर, निवेदिता शेटे, धनेश पडवळ, केपीएमजी कंपनीच्या सहायक व्यवस्थापक डॉ.अश्विनी दरेकर, मॅग्नेट सोसायटीचे प्रकल्प अधिकारी यादव आदी उपस्थित होते.

कराराचा यासाठी होणार उपयोग
१. बाजारपेठेतील उत्पादन आणि उत्पादकता,
२. काढणीनंतरचे व्यवस्थापन
३. उत्पादनातील नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाला समर्थन,
४. प्रशिक्षण, क्षेत्र भेटी,
५. प्रात्यक्षिके, तंत्रज्ञानाद्वारे शेतकऱ्यांची क्षमता वाढविणार

‘मॅग्नेट’ अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्या, बचत गट,खासगीी उद्योजक यांचा संस्थात्मक तांत्रिक आणि विपणन विषयक क्षमतांचा विकास करण्यात येईल. याद्वारे शेतकऱ्यांना विविध प्रशिक्षणे दिली जातील. पहिल्या टप्प्यात भेंडी, मिरची आणि केळी पिकाविषयी चांगल्या शेती पद्धती विषयी प्रशिक्षणे राबविण्यात येतील.
- दीपक शिंदे, संचालक, ‘मॅग्नेट’चे प्रकल्प

02653

Web Title: Todays Latest District Marathi News Nar22b01387 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..